मराठी प्रकाशनाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेत प्रतिवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात. गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या लाखाच्या आसपास जाईल. कदाचित मराठीतील सर्व पुस्तकांची संख्या काही लाखातही असण्याची शक्यता आहे.
दुर्दैवाने यातील बहुसंख्य पुस्तके अजूनही ऑनलाईन माध्यमात विक्रीसाठी उपलब्ध असणे सोडाच पण त्यांची माहितीसुद्धा ऑनलाईन माध्यमात उपलब्ध नाही.
पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायविषयक माहिती देण्यासाठी काही प्रकाशकांकडून नियतकालिके प्रकाशित होत असतात. मात्र यात मुख्यत: त्यांच्या स्वत:च्या प्रकाशनांची माहिती जास्त असते.
बाजारात आलेल्या सर्व पुस्तकांची माहिती देणारे एखादे नियतकालिक सुरु झाले तरीही मराठी पुस्तक प्रकाशनाचा वेग बघता एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तकांची माहिती देण्यासाठी दर महिन्याला किती पाने खर्च होतील त्याचा अंदाज यावा. त्यात पुन्हा जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त प्रती छापायला लागणार आणि ते खर्चिक काम होणार. यावर एकच मार्ग… तो म्हणजे फक्त ऑनलाईन माध्यम !
यासाठीच “मराठीसृष्टी”च्या वतीने पुस्तक आणि प्रकाशन क्षेत्रासाठी…
मराठी पुस्तकांची ग्लोबल जत्रा