← Back to Previous Page

ऐकलत का Starred Book

aiklat ka by vishwas datye

ऐकलत का

छापील पुस्तक

स्वतःच्या औद्योगिक विश्वातील अनुभवांवर आधारित आहेत या गोष्टी. नुकतेच जॉबला लागलेले विद्यार्थी, तरुण व्यवस्थापकांना आणि लहान उद्योजकांना ह्या गोष्टी नक्कीच आवडतील व उपयोगी पण ठरू शकतील. तसेच उद्योग जगाशी संपर्क नसलेल्या लोकांना सुद्धा भावतील अशी अपेक्षा आहे. पुस्तकाची भाषा उगीचच बोजड होऊ नये म्हणून, मराठीत पूर्णपणे रुजलेले काही इंग्रजी शब्द तसेच वापरले आहेत.

किंमत: ₹100

सवलत किंमत: ₹80

माझा असा ठाम विश्वास आहे की व्यवस्थापन आणि जीवन दोन्हीही एकाचवेळी अत्यंत आनंददायी होऊ शकतात. सरळ आणि समजायला सोप्या भाषेत गोष्टी सांगायची पद्धत, वाचकांना पसंत पडेल अशी अपेक्षा आहे.

हे व्यवसायाभिमुख पुस्तक फार एक सुरी होऊ नये म्हणून मधून मधून माझे काही लेखही उधृत केले आहेत. हा नवीन प्रकार वाचकांना आवडेल अशी पण अपेक्षा आहे.

१९७० सालापासून, मला औद्योगिक क्षेत्रातील ५० वर्षाचा वैविध्यपूर्ण अनुभव आहे. ज्यातील ३५ वर्षे फिलिप्स कंपनीमध्ये असतांना लहान, मध्यम आणि वरिष्ठ हुद्यांवर काम करण्याचा अनुभव मिळाला. सेवानिवृत्तीनंतर १५ वर्षे निरनिराळ्या लहान / मोठ्या कंपन्यांना प्रशिक्षक आणि सल्लागार रूपात मदत केली.

भारतामध्ये सर्वदूर काम करायची संधी मिळाली, शिवाय, हॉलंड, बेल्जियम, सिंगापूर, मलेशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, कतार, युएई अशा अनेक देशातही काम करायची संधी मिळाली.