फिरकीचा तांब्या – लोटपोट लोळवणूक – १
Firkicha Tambya Lotpot Lovavnuk Part 1
विनोदाच्या केंद्रस्थानी स्वतः लेखक असणे हा विनोदासाठी खूप बिनधोक विकल्प आहे. अशा विनोदात अब्रुनुकसानीचा धोका नसतो! तर कपोलकल्पित पार्श्वभूमीवर बेतलेल्या विनोदात अतिशयोक्तीला बंधन नसते. या दोन्ही तंत्रांचा लेखकाने "फिरकीच्या तांब्या" मधे वापर केला आहे. सोशल मिडियावरील लोकप्रिय लेखक श्री प्रकाश तांबे यांची ही पहिलीच कलाकृती.
सवलत किंमत: ₹30
सोशल मिडियावरील लोकप्रिय लेखक श्री प्रकाश तांबे यांची ही पहिलीच कलाकृती.
टाटा समूहाच्या अग्रगण्य उद्योगात प्रदीर्घ काळ सेवा करताना निरीक्षणाच्या उपजत प्रवृत्तीमुळे लेखक असंख्य विनोदी घटनांचा साक्षीदार तर झालाच शिवाय काही घटनांच्या घडण्यामागे प्रेरणाही त्यांचीच होती. त्यांना या प्रवासात मिश्किल, मार्मिक सहका-यांची साथही लाभत गेली परंतु व्यंग आणि अश्लीलतेतून घडणा-या विनोदाला त्यांनी कधीच जवळ केले नाही. ते फार काळ टिकत नाहीत ह्या मताशी ते ठाम आहेत.
विनोदाच्या केंद्रस्थानी स्वतः लेखक असणे हा विनोदासाठी खूप बिनधोक विकल्प आहे. अशा विनोदात अब्रुनुकसानीचा धोका नसतो! तर कपोलकल्पित पार्श्वभूमीवर बेतलेल्या विनोदात अतिशयोक्तीला बंधन नसते. या दोन्ही तंत्रांचा लेखकाने “फिरकीच्या तांब्या” मधे वापर केला आहे.
